गाझाची रसद तोडल्याने नागरिकांची उपासमार   

इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच

डेर अल बलाह : गाझा पट्टीत इस्रायलकडून हमास दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच आहे. हवाई हल्ल्यात सोमवारी १७ नागरिकांचा मृत्यू  झाला. दरम्यान, महिन्याभरापासून इस्रायलने गाझाची रसद तोडली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. 
 
युद्धबंदी मोडीत काढल्यापासून गाझात इस्रायलकडून निरंतर हवाई हल्ले सुरूच आहेत. गेल्या महिन्याभरापासून इस्रायलने रसद तोडली आहे. त्याचा फटका २० लाख नागरिकांना बसला असून त्यांचे औषध आणि अन्नपाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे ओलिसांची सुटका करा, अशी मागणी हमास नागरिकांकडे आता करु लागले आहेत.
 
केवळ आणि केवळ उर्वरित ओलिसांची  हमासने सुटका करावी.  यासाठी इस्रालयची धडपड मार्चपासून सुरू आहे.  त्यासाठी दबाव वाढविण्यासाठी आक्रमक हवाई हल्ले केले जात आहेत. त्यामध्ये नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. आता हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला जात आहे. पण, त्याकडे इस्रायलने साफ दुर्लक्ष करत हल्ले सुरू ठेवले आहेत. हमास दहशतवाद्यांना कोणच्याही परिस्थितीत गुडघे टेकविण्यासाठी बाध्य करण्याचा चंग इस्रायलने बांधला आहे. 

Related Articles